Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या अपघातानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या बचाव कार्याची माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर पीएम मोदी ओडिशातील अपघातस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी अपघातस्थळी पाहणी केली आणि घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
तसेच मोदींनी अद्याप सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावरून कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यास सांगितले.
#WATCH | “It’s a painful incident. Govt will leave no stone unturned for the treatment of those injured. It’s a serious incident, instructions issued for probe from every angle. Those found guilty will be punished stringently. Railway is working towards track restoration. I met… pic.twitter.com/ZhyjxXrYkw
— ANI (@ANI) June 3, 2023
पीडितांना आवश्यक ती मदत मिळत राहावी यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत विचारपूस देखील केली. हा सर्वात मोठा अपघात असून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.