आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी 11 जूनला प्रस्थान होणार आहे. माऊलींचा प्रस्थान सोहळा मंगळवार दि. 6 जून ते 12जून दरम्यान संपन्न होणार आहे. या उत्सवासाठी राज्यासह परराज्यातून सुमारे 4 ते 5 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या काळात आळंदी व परिसरामध्ये रस्त्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहनांना बुधवार दि. 7 जून ते सोमवार दि. 12 जूनपर्यंत आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.
बंद असणारे मार्ग आणि पर्यायी मार्ग –
1) पुणे-आळंदी रस्त्यावर मॅग्झिन चौक येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण : मॅक्झिन चौक
पर्यायी मार्ग: पुणे-दिघी-मॅग्झिन चौक-भोसरी-मोशी-चाकण
2) मोशी- देहुफाटा रस्त्यावर डुडूळगाव जकात नाका येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण: हवालदार वस्ती
पर्यायी मार्ग : मोशी-चाकण-शिक्रापूर तसेच मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी
3)चाकण (आळंदी फाटा)- आळंदी रस्ता येथे इंद्रायणी हाॅस्पिटलजवळ नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण: आळंदी फाटा
पर्यायी मार्ग: चाकण-मोशी-मॅग्झिन चौक-दिघी-पुणे (पुणे बाजूकडे जाण्याकरिता),
तसेच चाकण-शिक्रापूर-नगर हायवे पुढे सोलापूर हायवे
4)वडगाव घेनंद (शेलपिंपळगाव फाटा)- आळंदी रस्ता कोयाळी कमान येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण : कोयाळी फाटा
पर्यायी मार्ग : वडगाव घेनंद-शेलपिंपळगाव फाटा-चाकण-नाशिक हायवे रोडने पुणे
5) मरकळ-आळंदी रस्ता, पी.सी.एस. कंपनी फाटा येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण: धानोरे फाटा\पीसीएस चौक फाटा
पर्यायी मार्ग : मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द- पीसीएस कंपनी फाटा बायपास रोडने चऱ्होली बु. पुणे
मरकळ-कोयाळी-वडगाव घेनंद-पिंपळगाव फाटा-चाकण
6) चिंबळी चिंबळी फाटा – आळंदी रस्ता, केळगाव बायपास येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण: चिंबळी फाटा
पर्यायी मार्ग : चिंबळी-मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी-पुणे
दरम्यान, आळंदीतील जे कर्मचारी कामानिमित्त आळंदीच्या बाहेर जात असतात त्यांना 6 तारखेपासून आळंदी पोलिसांकडून पास देण्यात येणार आहेत. पाससाठी अर्ज करताना सोबत आधारकार्ड, ज्या कंपनीत कामाला आहे त्या कंपनीचे ओळखपत्र, विद्यार्थी असल्यास काॅलेजचे ओळखपत्र आवश्यक असणार आहे.