Vicky Kaushal Diet| बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबाबत वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटात अभिनेत्यासोबत रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर विकीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात विकी पाणीपुरीच्या स्टॉलवर असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटातील भूमिकेसाठी विकी बऱ्याच काळापासून कठोर आहार पाळत आहे. मात्र चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेत त्याने थेट पाणीपुरीवर ताव मारला. या व्हिडिओत व्हिडिओमध्ये आमिर खानच्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातील ‘पहला नशा पहला खुमार’ गाणे वाजत आहे. त्याने या व्हिडिओला “खूप महिन्यांनी चीट मील. ती सुद्धा पाणीपुरी… मी आता रडेल… अक्षय अरोरा आय लव्ह यु.. ” असं कॅप्शन दिलं आहे. अक्षय अरोरा हा विकीचा मित्र असून तो त्याच्या डाएटची सुद्धा काळजी घेतो. Vicky Kaushal Viral Video|
View this post on Instagram
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई राणीसाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘बॅड न्यूज’ या सिनेमातही काम करतोय. या सिनेमात तो तृप्ती डिमरी, अॅमी विर्क यांच्यासोबत काम करत आहे. 19 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे. Vicky Kaushal Viral Video|
हेही वाचा:
मनोज तिवारी विरोधात काँग्रेसने मैदानात उतरवलेले कन्हैया कुमार कोण आहेत ? ; काय आहे पक्षाची रणनीती?