वाठार स्टेशन -भाट निमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत रवींद्र शिंदे यांचा आज लोणंद- सातारा मार्गावरील अंबवडे चौकाजवळ रस्ता अपघातात मृत्यू झाला.
ते साताऱ्याकडे जात असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दर्घटना घडली. वाठार पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत रवींद्र शिंदे मोटरसायकलवरून (एमएच 42 एक्स 5810) सातारच्या दिशेने जात असताना अंबवडे चौक या ठिकाणी साताऱ्याकडे जाणाऱ्या ट्रकला (एचआर 65- ए 3384) धडकले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलीस घटनास्थळी हजर झाले. मृत डॉ. श्रीकांत शिंदे यांचे शव विच्छेदन करण्यासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. हवालदार किशोर गिरी तपास करीत आहेत.