डेहराडून – हिंदू धर्मात चारधाम यात्रेस महत्व आहे. असं म्हणतात जन्मात एकदा तरी चार धाम यात्रा करावी. आता ही लवकरच यात्रा सुरु होत आहे. नुकतेच उत्तराखंड प्रशासनाने एक पत्रक जारी केले आहे. मागील दोन वर्षपासून कोरोनाच्या विषाणूमुळे यात्रेस निर्बंध लाविण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या यात्रेकडून यंदा जास्त अपेक्षा आहेत. भाविकांच्या सोयी-सुविधांच्या दृष्टीने सर्वाधिक भर यात्रेच्या मार्गावर आहे.
ऋषीकेशपासून बद्रिनाथपर्यंत ५०० किलोमीटरच्या मार्गाचा कायापालट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. परंतु यमुनाेत्रीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे हाल दिसून येतात. चारधाम यात्रेच्या मार्गावर अद्यापही ४० ठिकाणे भूस्खलनाची आहेत. ही ठिकाणे स्थानिक प्रशासन व सरकारसाठी आव्हानाची ठरू शकतात. या अत्यंत जाेखमीच्या ठिकाणांच्या मलमपट्टीसाठी १०० कोटींवर खर्च केला जाणार आहे. म्हणूनच चारधाम यात्रेपूर्वी या मार्गाचे काम पूर्ण होणे अशक्य वाटू लागले आहे. गंगोत्री-यमुनाेत्री महामार्गाच्या कामाची गतीही खूप कमी आहे.
केदार : निर्माणाचा वेग कमी, डेंजर झोन जास्त
केदारनाथ महामार्गावर बासवाडा, बडासू, डाेलिया देवीजवळ मंदिराजवळ डेंजर झोन आहे. महामार्गावरील वाहतुकीत अडचणी आहेत. गाैरीकुंडचाा पाच किमीचा मार्ग अरुंद आहे.
बद्रीनाथ : जास्त धाेकादायक
बद्रीनाथ महामार्गावर कमेडा, चडुवा पीपल, कालेश्वर, लंगासू, बैडाणू, देवलीबगड, नंदप्रयाग, मैठाणा, कुहेड, बिरही चट्टान, भनारपानी, हेलंग, सेलंग, लामबगड इत्यादी डेंजर झोनमध्ये आहेत.
गंगोत्री : मार्गावर जोखीम
गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर चंबापासून धरासूदरम्यान १२ हून जास्त डेंजर झोन आहेत. कंडीसौडच्या जवळ राेमलगावमध्येही अशा प्रकारे जमीन धसू. चिन्यालीसौडजवळ धोका.
यमुनोत्री
अनेक डेंजर झोन | यमुनाेत्री राष्ट्रीय महामार्गावर धरासू बँडपासून सिलक्यारपर्यंत दोन फोठे डेंजर झोन आहेत. रस्त्याची स्थिती देखील दयनीय आहे.