कुरकुंभ – करोना व्हायरसबाबत अनेक गैरसमज पसरबिणारे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्राण्याच्या मांसातून हा व्हायरस पसरत असल्याचे मेसेज व्हायरल होत असल्याने, मांसाहारी खाद्यप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी जिभेचे चोचले पुरविणे थांबविले आहे.
चीनमधील करोना व्हायरसच्या प्रादूर्भावाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे चीनच्या नागरिकांना अन्य देशांत प्रवेशबंदी आहे. करोनाचा प्रादूर्भाव मांसामधून होत असून, मांसाचा बाधित तुकडा दाखविला जाणारा मेसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे मांसाहारीप्रेमींनी बंधने घातली आहेत.