पुणे – ११ महिन्याच्या चिमुकलीचा तब्बल 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन दिल्यानंतरही मृत्यू झाला आहे. वेदिका शिंदे असे या चिमुरडीच नाव असून तिला हिला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन हा दुर्मिळ आजार झाला होता. वेदिका भोसरी येथील असून तिच्या उपचारासाठी लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमा करून तिला इंजेक्शन देण्यात आले होते.
वेदिकाला लागणारे जीन रिप्लेमेंटचे झोलजेन्स्मा हे औषध अमेरिकेतून आले होते. मुलीच्या दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी लागणारे 16 कोटी रुपये तीन महिन्यांत क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून जमा केले होते. 15 जूनला वेदिकाला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देण्यात आले होते.
पंधरा जून रोजी वेदिकाला इंजेक्शन दिले होते. तेव्हा पासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना वेदिकाला अचानक श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केला. मात्र उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. वेदिकाच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.