मेष : नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.
वृषभ : विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. कामात नवीन आव्हाने स्वीकारून ती तडीस नेण्याचा मानस असेल.
मिथुन : व्यवसायात बदल करताना मोठी गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या.
कर्क : उधार उसनवार टाळा. नोकरीत इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यात यशही मिळेल.
सिंह : परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
कन्या : प्रियजनांसमवेत छोटीशी सहल काढाल. मुलांच्या मागण्या, हट्ट पुरवाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तूळ : अभ्यासात मित्र-मैत्रिणींवर विसंबू नये. वातावरणाची उत्तम साथ मिळाल्याने उत्साह ओसंडून जाईल.
वृश्चिक : व्यवसायात अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. मोठे बेत प्रत्यक्षात साकार होतील. पाहुण्यांची ये-जा राहील.
धनू : जमा-खर्चाचे गणित समसमान राहील. नोकरीत भावनेच्या भरात जादा कामे ओढवून घेऊ नका.
मकर : बेकारांना नोकरी मिळेल. घरात नवीन वाहन, वास्तूच्या खरेदीत महिलांचा बराच वेळ जाईल.
कुंभ : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. जीवनात एक नवा दृष्टिकोन ठेवून कामाला लागाल.
मीन : व्यवसायात नवीन कामे मिळतील ती स्वीकारण्यापूर्वी स्वतःची आर्थिक व शारीरिक कुवत ओळखा.