वरुण दिसणार शूर सैनिकाच्या भूमिकेत

बॉलीवूडमध्ये आलेला बायोपिकचा ट्रेंड अद्यापही कायम असून उलटपक्षी तो अधिक जोर धरताना दिसत आहे. विशेषतः भारतीय सैन्यातील शूर सैनिकांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी अनेक निर्माते-दिग्दर्शक उत्सुक दिसत आहेत. आता याच मालिकेमध्ये अरुण खेत्रपाल यांचा समावेश झाला आहे.

 अरुण हे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले परमवीर चक्र विजेते लेफ्टनंट होते. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात अरुण खेत्रपालांची व्यक्‍तिरेखा अभिनेता वरुण धवन साकारणार आहे. त्यामुळे चुलबुला म्हणून ओळखला जाणारा वरुण पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या गणवेशात पडद्यावर दिसणार आहे.

वरुण सध्या “कुली नंबर 1′ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलीकडेच अरुण खेत्रपाल यांचा जन्मदिन संपन्न झाला. त्याच दिवशी त्यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अनेकांना माहीत नसेल पण 14 ऑक्‍टोबर 1950 रोजी या शूर सैनिकाचा जन्म पुण्यामध्येच झाला होता. त्यांच्यावर आधारित चित्रपटाचे नाव अद्याप निश्‍चित झालेले नाही.

 

View this post on Instagram

 

Heroine tera birthday aaya, birthday ke din main tere liye poster laya! Happy 22nd bday @saraalikhan95 cyu guys may1st2020

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)