बॉलिवुड ब्युटी प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, कृति सेनन, वाणी कपूर, नुसरत भरूचासह अनेक बी-टाउन सिलेब्स नुकत्याच एका पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
या पार्टीतील एक फोटो वाणी कपूरनेही इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात वाणी कपूर आणि प्रियांका चोप्रा “वॉर’ चित्रपटातील “घुंघरू’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
याप्रसंगी वाणी कपूरने ब्राउन कलरचा ड्रेस, तर प्रियांकाने व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केलेला होता. दरम्यान, या पार्टीत बॉलिवुड ब्यूटीजशिवाय एकता कपूर, राजकुमार राव, पत्रलेखा, अर्पिता खान शर्मा, आयुष्मान खुराना, ताहिरा कश्यपसह अन्य कलाकार सहभागी झाले होते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वाणी कपूर ही लवकरच रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत आगामी चित्रपटात झळकणार आहे. दुसरीकडे प्रियांका चोप्रा आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईला आलेली आहे. यापूर्वी वाणी कपूर “वॉर’, तर प्रियांका चोप्रा “स्काई इज पिंक’ चित्रपटात झळकली होती.