माळरानावर भोपळ्याचे विक्रमी उत्पादन

वडगाव मावळ – येथील प्रगतीशील शेतकरी दिनेश भगवान पगडे यांनी त्यांच्या डोंगराळ पडिक जमिनीत डांग्या भोपळ्याचे विक्रमी उत्पादन घेवून इतरांना प्रेरणा दिली.

दिनेश भगवान पगडे यांच्या डांग्या भोपळ्याच्या शेतीची परिसरात चर्चा असून, कृषी अधिकारी डी. एच. ढगे यांनी तसेच अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

सह्याद्रीच्या डोंगररांगा वसलेल्या मावळ तालुक्‍यातील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने शेतकरी माळरान, डोंगराळ व पडिक जमीन विकून टाकत असताना केवळ पगडे कुटुंबीयांनी जिद्दीने व मेहनतीने स्वतःच्या डोंगराळ पडिक जमीनीवर गेल्या अनेक वर्षांपासून ज्या डोंगराळ पडिक जमिनीवर गवताशिवाय काहीच उगवत नव्हते. त्या जमिनीत मातीचा थर नावालाच मुरूम व डबर अधिक असल्याने उन्हाळ्यात त्या डोंगराळ पडिक जमिनीत जागोजागी चार फूट लांबी, रुंदी व खोलीचे खड्‌डे घेवून त्यात सेंद्रिय खत व माती टाकून खड्डे भरून घेतली. त्या खड्ड्यात जुलै व ऑगस्ट दरम्यान डांग्या भोपळ्याच्या बियाचे रोपण करून केवळ सेंद्रिय खत देवून त्यांची जोपासना करण्यात आली. सद्यस्थितीला सुमारे 20 ते 25 किलो वजनाचे हजारो भोपळे लागले आहेत. सध्या पितृपक्ष असल्याने डांग्या भोपळ्याला प्रती किलो 50 ते 60 रुपयांचा भाव मिळत आहे.

हा भोपळा आहारात वापरात असल्याने मागणी कायम असते. तळेगाव दाभाडे व वडगाव मावळ बाजारात तसेच काही व्यापारी किरकोळ भावात घेउन जातात. हा प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरातील शेतकरी डांग्या भोपळ्याची शेती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. या छोट्याच्या भोपळ्याच्या शेतीतून लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी वेलांना फळ लागत आहेत.

दिनेश पगडे म्हणाले की, मावळ तालुक्‍यात मुबलक पाऊस पडत असून, पाण्याचे योग्य नियोजन करून असलेल्या डोंगराळ, माळरान व पडिक जमिनीत जिद्दीने, मेहनतीने, आत्मविश्‍वासाने शेतीत कष्ट केल्यावर नक्‍कीच यश मिळते आणि ते यश आम्ही मिळविल्याचा आनंद होत आहे.

दिनेश भगवान पगडे यांच्या डांग्या भोपळ्याच्या शेतीची परिसरात चर्चा असून, कृषी अधिकारी डी. एच. ढगे यांनी तसेच अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.