Manoj jarange Loksabha : आज वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत थेट मनोज जरांगे यांना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. वंचितकडून तयारी करण्यात आलेल्या २७ लोकसभा मतदार संघातीची यादी देखील माविआ बैठकीत देण्यात आल्याचे समजते. या बैठकीत वंचितने आपल्या चार प्रमुख मागण्या असल्याचे देखील म्हंटले आहे.
वंचित बहुजन आघाडीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच लोकसभेसाठी त्यांनी 27 मतदारसंघामधून लढण्याची तयारी केली असल्याचे सांगितले आणि त्याची यादी देखील दिली. एकूणच आजच्या बैठकीत वंचितने माविआसमोर चार प्रमुख प्रस्ताव ठेवले. | Manoj jarange Loksabha
मनोज जरांगे यांना त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण मराठा समाजाने पाठींबा दिला होता. मात्र सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन वेगळं आरक्षण जाहीर केलं यानंतर आता जरांगे यांच्या निवडणूक लढण्याचा मुद्दा थेट माविआच्या चर्चेत गाजल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. | Manoj jarange Loksabha
वंचितने ठेवले माविआ समोर चार महत्वाचे प्रस्ताव
जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ.अभिजित वैद्य यांना कॉमन कॅण्डीडेट म्हणून जाहीर करावे
माविआच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत
पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.असे महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन दिले पाहिजे.
किमान 03 अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.
वंचितने दावा केलेले मतदार संघ कोणते ?
वंचितने महाविकास आघाडीपुढे ठेवलेल्या प्रस्तावात अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलढाणा, वर्धा या मतदार संघांचा समावेश आहे.