नगर – प्रेमाचा दिवस म्हणून मानला जाणारा व्हॅलेंटाईन डे शहरातील प्रेमवीरांनी एकमेकांना गुलाबपुष्पंसह स्पेशल भेटवस्तू देऊन साजरा केला. ऐरवी बाजारपेठेत पाच रुपयाला मिळणारे लाल गुलाबाचे फु ल आज चक्क वीस,पंचवीस ते तीस रूपयाला विकले गेले. शाळा,महाविद्यालयात मात्र विद्यार्थ्यांनी चोरी-छुपके पध्दतीने भेटकार्ड देऊन आनंद लुटला. सोशल मिडियावर मात्र व्हॅलेंटाईन डेची विशेष क्रेझ दिसून आली.
व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारपेठ गेल्या तीन दिवसांपासून सजली होती. अनेकांनी भेटकार्डसह अन्य भेटवस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. रेड रोझच्या माध्यमातून प्रेमवीरांनी एकमेकांचे प्रेम व्यक्त करीत आनंद लुटला.
पूर्वी या इव्हेंटला विरोध होत असला तरी आता सर्वत्र हा उत्सव तरूणाई साजरा करते. अनेकांनी गुप्तभेट घेण्यासाठी कॅफे हाऊस,रेस्टॉरंट याबरोबरच पर्यटन स्थळांची निवड केली. लाल गुलाबांसोबतच विविध भेटवस्तू अन चॉकलेटची देवाणघेवाण झाली. सोशल मिडियावर यानिमित्त मोठी क्रेझ दिसून आली.