वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथे ‘रिल्स स्टार’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेतेपदाचा मान आदित्यराजे मराठे यांच्या ‘मावळचा जलनायक’ या रिलने मिळविला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार सुनील शेळके व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला एक लाख अकरा हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षिस अभी मोरे, तृतीय प्रजुल ढाकोळ, चतुर्थ किशोर तांदळे, पाचवा अजित घावटे, सहावा गणेश चोरघे, सातव्या क्रमांकाचे बक्षिस राहुल पाटील यांना देण्यात आले. ‘मोस्ट लाईक्स आणि व्ह्यूज’ हे विशेष पारितोषिक गणेश चोरघे यांना देण्यात आले. स्पर्धेत सहभागी तीस जणांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
युवकांच्या करियरसाठी केलेल्या कार्याबद्दल काव्या करिअर अॅकॅडमीचे संस्थापक शंकर हुरसाळे यांना गौरविण्यात आले. अनिकेत घुले यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांप्रदायिक क्षेत्रातील संग्राम भंडारे, कबीर आत्तार, सोपान कण्हेरकर, अमलेश जवळकर, मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, प्रा. विठ्ठल कांगणे, वास्तुशास्त्र तज्ञ आनंद पिंपळकर, मधुकर वाघोले, देवा गायकवाड, अतुल मराठे, प्रकाश धिंडले, कलाकार सुभाष मदने, अभिनेत्री मोनालिसा बागल, आदी मान्यवर उपस्थित होते.
सुमन नलावडे व अमीन खान यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. उमेश डोके यांनी प्रास्ताविक केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.