मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखीच चिघडल्याचे चित्र आहे. काल राष्ट्रवादीचे जेष्ट नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही आक्रमक झालेल्या आंदोलकांनी उग्र आंदोलन केले. यावेळी पवार यांच्या निवास्थानावर दगड व चपला देखील फेकल्याचे दिसून आले. मध्यरात्रीपर्यंत हा गोंधळ सुरुच राहीला यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानावरून काढले त्यावेळी या जमावाने थेट सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला आहे.
यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकातही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी रेल्वे स्थानकावर कर्मचारी आक्रमक होऊ नयेत म्हणून त्यांना वडापाव हाव दाखवत ताब्यात घेतले.
मिळलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू केलेल्या गोंधळाला पोलिसांनी शांत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना ‘१०० वडापावची ऑर्डर दिली, सगळ्यांनी १८ नंबर फलाटावर चला’ आणि तिथेच तुम्ही आंदोलनासाठी बसा असंही या कर्मचाऱ्यांना सांगितले.
एसटी कर्मचारी वडापावची खाण्याचा हवासा पोटी सर्व १८ क्रमांक फलाटावर गेले, तेव्हा या आलेल्या एसटी कर्मचारी पोलिसांच्या सापळ्यात अडकले आणि त्यानंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेल.
दरम्यान, पोलिसांनी १८ क्रमांक फलाटावर एसटी कर्मचाऱ्यांना नेले कारण १८ नंबर फलाट मोकळं आणि सुटसुटीत आहे. तिथे गाड्यांना पार्किंगसाठी मोठी जागा आहे, पळून जाण्यास तिथे कोणताच मार्ग नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना ताब्यात घेणं सोप्पं होतं. आणि त्यामुळे पोलिसानी
सुरुवातीला कर्मचारी आक्रमक होऊ नयेत म्हणून पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली. पण त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू झालेला हैदोस पोलिसांनी शांत करण्याचा निर्णय घेतला. एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना ‘१०० वडापावची ऑर्डर दिली, सगळ्यांनी १८ नंबर फलाटावर चला’ आणि तिथेच तुम्ही आंदोलनासाठी बसा असंही या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी लगेच कर्मचाऱ्यांना तिथे नेऊन आपला हेतू साध्य केला.
दरम्यान, मुबई उच्च न्यायालयाने 22 तारखेपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिल्यानंतर देखील एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखीच वाढले आहे. पवारांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी जमावाला भडकावल्याप्रकरणी आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखाल करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.