मंगळुरू – कर्नाटकातील मंगळुरू येथून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या BMWने डिव्हाइडर तोडून एका स्कूटीवर असलेल्या महिलेला चिरडले आहे. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओ बघून तुम्ही म्हणाल 'अरे बापरे',अपघाताचा भयंकर थरार; भरधाव BMWची स्कूटीला धडक#ACCIDENT pic.twitter.com/aMvwBP9Mv9
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) April 10, 2022
घडलेला अपघात मंगळुरू जिल्ह्यातील बल्लभगढ जंक्शन येथील आहे. दुपारच्या वेळी अतिशय स्पीडमध्ये आलेल्या BMW कारने डिव्हाइडर क्रॉस करुन दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या स्कूटी चालक महिलेला उडवले. BMW इतकी वेगात होती, की डिव्हाइडर पास करून कार दुसऱ्या बाजूला गेली व स्कूटीवर असलेल्या धडक दिली. यामध्ये अन्य् एक महिला जखमी झाली आहे तर स्कूटी चालक महिला गंभीर जखमी आहे. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.