पंढरपूर – पौराणिक मान्यतांनुसार, भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला झाला होता, जो हिंदू लोक ‘रामनवमी’ म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस 10 एप्रिल रोजी आहे.
आणि याच दिवसाचे औचित्य साधून आज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक नयनरम्य अशी सफरचंद फळ व फुलांची आरास करण्यात आली आहे.
यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. देवाचे हे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणेच फिटले. भक्त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.