नवी दिल्ली- जगभरातील ज्या कोरोना लसीवर काम सुरु आहे. त्या लसी प्रत्यक्षात कितपत परिणाम कारक ठरतील याची शाश्वती नाही, असं WHO च्या प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी सांगितलं आहे. जगभरात 18 ठिकाणी लशीचं काम सुरु आहे.
कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून सगळं जग लशीची वाट बघत आहे. तसंच दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच आहे. त्यात अनेक कंपनीने आपली लसीचे टप्पे जाहीर केले होते. ऑक्सफर्डची लस पहिले येणार अशा चर्चाही रंगल्या होत्या.
मात्र आता WHO च्या प्रमुखांनी सांगितल्यावर लशीबाबतची शक्यता मावळली आहे. त्यामुळे प्रशासनात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आतापर्यंत WHO या संघटनेकडून अनेक लसींची पडताळणी करण्यात आली आहे. लवकरच सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल अशी आशा आम्हाला आहे, असंही ते म्हणाले आहेत.