पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परवाना किंवा त्यासंबंधिच्या सेवांसाठी नागरिकांना ऑनलाइन स्लॉट घेणे आवश्यक असते. या कोट्यामध्ये बदल केला असून, दरदिवशी 500 पर्यंत कोटा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोना पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध कामांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आणि संबंधित कागदपत्रे कार्यालयात सादर करण्यासाठी ऑनलाइन “स्लॉट’ बुक करणे आवश्यक असते. करोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन व्हावे, या हेतूने ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कार्यालयाचे काम सुरू झाल्यानंतर दरदिवशी केवळ 80 जणांना पूर्वनियोजित वेळ मिळत होती. मात्र, कार्यालयात होणारी गर्दी लक्षात घेत आता 500 पर्यंत कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 26 मेनंतर ज्या अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. परंतु, स्लॉटची नोंद घेतलेली नाही, अशांनी स्लॉट बुक (रिशेड्युल) करून कागदपत्रे जमा करावीत, असे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.