नवी दिल्ली – केंद्र सरकारने एनडीएवर आधारीत असलेल्या जगातील पहिल्या नूर्लीें-ऊ या झायडस कॅडिलाच्या करोनावरील लसीला काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली. ही लस 12 वर्षांवरील मुलांसाठी विकसित करण्यात आली आहे. येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना करोनावरील Zycov-D ही लस दिली जाईल, अशी माहिती एनटीएजीआयचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी दिली.
अरोरा म्हणाले, तीन डोस असलेली ही लस आहे. येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना लस दिली जाईल. गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाईल. राज्य सरकारांनी मुलांच्या बौद्धीक विकासासाठी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
12 ते 18 वर्षांदरम्यानच्या गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी राज्यांनी तयार करावी. यामुळे या मुलांना सर्वात आधी लस मिळू शकेल. ही लस देण्यापूर्वी संबंधीत यादी जाहीर केली जाईल. या यादीच्या आधारावर 12 ते 17 ऑक्टोबरदरम्यान गंभीर आजार असलेल्या मुलांना लस देण्यास सुरुवात केली जाईल, असे अरोरा यांनी सांगितले.