विलासपूर – कायदेशीर पत्नी असलेल्या महिलेसोबत शरिरसंबंध ठेवणे मग ते तिच्या इच्छेविरूध्द जरी असले तरी बलात्कार ठरत नाही, असे एका निवाड्यात विलासपूर उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या आपल्या पत्नीसोबत पुरूषाने यौन संबंध ठेवले अथवा कोणती यौन क्रिया केली तर ती बलात्कार असू शकत नाही. भलेही ते तिच्या इच्छेविरूध्द झालेले असेल असे न्या. एन. के. चंद्रवंशी यांनी याचिकाकर्त्या महिलेच्या अर्जासंदर्भात भाष्य केले.
बेमेतरा जिल्ह्यातील या महिलेने आपल्या पतीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यावरून कनिष्ठ न्यायालयाने पतीला दोषी ठरवले होते. त्याला पतीने आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.