Uttar Pradesh Crime । प्रदेशातील बदायूंमध्ये एका व्यक्तीने तीन मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तिसरा मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी आरोपी साजिदला चकमकीत ठार केले आहे. साजिद जेव्हा मुलांना मारण्यासाठी घरात घुसला तेव्हा त्याने त्यांच्या आईकडून पैसे उसने मागितल्याचे समोर आले आहे.
ही घटना सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा कॉलनीत घडली. मंडी पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली. मंगळवारी सायंकाळी उशिरा साजिद नावाचा व्यक्ती विनोद सिंग यांच्या दुकानासमोरील घरात घुसला. यावेळी त्याने विनोदच्या पत्नीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.
Uttar Pradesh Crime । मुलांच्या आईने काय सांगितले?
“मी माझ्या घरात कॉस्मेटिकचे दुकान चालवते आणि वर माझे पार्लर आहे. संध्याकाळी साजिद घरी आला आणि त्याने आधी क्लचर्स मागितले, नंतर काही वेळाने, त्याने 5000 रुपये उधार मागितले.
मी माझ्या पतीशी बोलून त्याला 5000 रुपये दिले.त्यानंतर त्याने तब्येत ठीक नसल्याचे सांगून तो घरात वरच्या मजल्यावर गेला.
तेथे गच्चीवर माझे दोन मुले आयुष आणि युवराज होते. यावेळी साजिदने माझ्या मुलाला पाणी पिण्यासाठी मागितले. तो पाणी घेऊन वरच्या मजल्यावर गेला होता त्यावेळी किंचाळण्याचे आवाज येऊ लागले आणि साजिद हातात मोठा चाकू घेऊन रक्ताच्या थारोळ्यात उतरत होता.”
Uttar Pradesh Crime । आजीने रडत सांगितली घटना म्हणाली
‘सायंकाळी उशिरा न्हाव्याचे दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीने घरात घुसून आयुष, युवराज आणि आहान उर्फ हनी या तीन मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. ज्यामध्ये आयुष (12) आणि अहान (6) यांचा मृत्यू झाला आहे, तर युवराजला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.’
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी आरोपी साजिदच्या दुकानाला आग लावली आणि त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. एसएसपीसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि गर्दीवर नियंत्रण मिळवले.
बरेली झोनचे आयजी राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, ‘दोन मुलांची निर्घृण हत्या करताना रक्ताने माखलेला आरोपी साजिद उर्फ जावेद मुलगा बाबू घटनास्थळावरून पळून गेला. आमच्या पथकाला त्याची माहिती मिळताच त्याचा पाठलाग केला असता तो शेकुपूरच्या जंगलात दिसला. आमची एसओजी आणि पोलिस स्टेशन त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी होऊन मरण पावला.’
हे वाचल का ? प्रणिती शिंदेंविरोधात भाजपकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘या’ दिग्गज उमेदवाराला मिळणार तिकट ?