नवी दिल्ली – भारतात यापुढील काळात होणाऱ्या फुटबॉल सामन्यांमध्ये लवकरच वारचा (व्हिडीओ असिस्टंट रेफ्री) वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी दिली आहे.
कल्याण चौबे सध्या बेल्जियमच्या दौऱ्यावर असून, त्या देशामधील स्थानिक स्पर्धांमध्येसुद्धा वारच्या होणाऱ्या वापरानंतर भारतातसुद्धा असे तंत्रज्ञान पुढील फुटबॉल मोसमपासून वापरण्यात येणार आहे.
वारच्या वापरामुळे फुटबॉलच्या लढतींमध्ये मैदानावरील रेफ्रींकडून होणाऱ्या चुका टाळता येणार आहेत. सामन्यांमध्ये कमीत कमी चुका व्हाव्यात म्हणून पुढील मोसमापासून वारचा वापर केला जाणार आहे.