वॉशिंग्टन – येमेनमध्ये सुरू असलेल्या सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धाला आता अमेरिका पाठिंबा देणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे. सौदी अरेबियाचे स्वातंत्र्य आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा आहे, मात्र युद्धासाठी नाही. हे युद्ध संपले पाहिजे, असे बायडेन यांनी काल आपल्या पहिल्या परराष्ट्र धोरण विषयक भाषणात सांगितले.
सौदी अरेबियाने 2015 मध्ये येमेनमधील हौथी गटाच्या विरोधात युद्ध सुरू केले असून आतापर्यंत येमेनमधील मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे. सौदी अरेबियातून येमेनमध्ये लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करायलाही सुरूवात केली. सौदी अरेबियाच्या हल्ल्यामध्ये येमेनमधील शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सौदीने केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या बनावटीच्या बॉम्बचा वापर झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे येमेनमधील नागरिकांचे जीवन अतिशय कष्टप्रद बनले असून तेथे भूक आणि दारिद्रय कमालिचे वाढले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने आखाती देशांना आणि हौथी गटांना मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत जबाबदार धरले आहे.
दरम्यान, जर्मनीतील अमेरिकन सैन्य काढून घेण्यास सध्या स्थगिती देण्याची शक्यता असून, “एलजीबीटीक्यू’ चळवळीला त्यांचा पाठींबा असेल, असेही त्यांनी सांगितले.