Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील डेलावेअरमधील विल्मिंग्टनमध्ये जो बिडेन यांच्या ताफ्यातील कारला दुसऱ्या कारची धडक झाली आहे. जो बायडन आपली पत्नी जिल बायडन आणि त्याच्या कर्मचार्यांसह एक कार्यक्रमासाठी गेले असताना ही घटना घडली. मात्र यात सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघातानंतर बायडेन यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी धडक झालेल्या कारच्या ड्रायव्हरवर कारवाई केली. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, बायडेन यांनी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान विल्मिंग्टनमधील बायडेन-हॅरिस 2024 मुख्यालय सोडले. ते त्यांच्या निवडणूक प्रचार पथकासोबत होते. बायडेन यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच डेलावेअर परवाना प्लेट्स असलेल्या एका कारने प्रचार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील ताफ्यातील कारला धडक दिली.
BREAKING: A car has crashed into President Joe Biden’s parked motorcade in Wilmington, Delaware, leaving Biden “shocked.”
According to the Daily Mail, Biden’s Secret Service agents pulled their guns on the driver who rammed into one of the SUVs.
The man who was driving the car… pic.twitter.com/AgDknqHgl2
— Collin Rugg (@CollinRugg) December 18, 2023
या घटनेचा एका व्हिडीओ समोर आला आहे. यात सीक्रेट सर्व्हिस एजंट्स बायडेन यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन जात असल्याचे दिसत आहे. अपघातात कारच्या बंपरचे नुकसान झाल्याचेही दिसत आहे. या अपघातानंतर बायडन यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शस्त्रे दाखवत त्या ड्राइव्हरला घेरले आणि त्याची चौकशी केली.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये जी-20 परिषदेसाठी भारतात आलेले राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या सुरक्षेत चूक आढळली होती. बायडन यांच्या ताफ्यातील एका कारमध्ये दुसराच एक प्रवासी आढळला होता. कारवर हॉटेल आणि प्रगती मैदानात जाण्यासाठीचे पास लावण्यात आले होते, ते पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली. चौकशी केल्यानंतर कारचालकाने दुसऱ्या प्रवाशाला घेण्यासाठी गाडीचा वापर केल्याचे सांगितले. याप्रकरणी निष्काळजी चालकाला पकडून पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याची सुटका केली.