न्युयॉर्क :- अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यावर सर्वच खेळाडू आपले वर्चस्व राखत आहेत. भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियाचा सहकारी मॅथ्यु एब्डेन याच्यासह पुरुष दुहेरीत अफलातून खेळ करत थाटात उपांत्य फेरी गाठली. या जोडीने अमेरिकेच्या नाथनेल समानोस व जॅक्सन विथड्रॉ या जोडीवर 7-6, 6-1 अशी मात केली.
दरम्यान, बोपण्णा-एब्डेन जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ब्रीटनच्या ज्युलियन कॅश व हेन्री पॅटेन या जोडीवर 6-4, 6-7, 7-6 अशी मात केलीी होती.
महिला एकेरी..
यजमान अमेरिकेच्या कोको गॉफनेही थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोको गॉफने लॅटिव्हियाच्या जेलेना ओस्तापेंकोचा 6-0, 6-2 असा सहज पराभव केला. तर अन्य लढतीत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुश्कोव्हाने रुमानियाच्या सोरेना क्रिस्टावर 6-0, 6-3 अशी मात केली.
पुरूष एकेरी…
पुरुषांच्या एकेरीत यजमान अमेरिकेच्या फ्रान्सिस तैफुला धक्कादायक पराभवाचा सामना कराव लागला. त्याच्यावर त्याचाच देश सहकारी बेन शेल्टनने 6-2, 3-6, 7-6, 6-2 असा विजय मिळवला.