नवी दिल्ली – महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या वारशामुळे खूप प्रभावित झालो आहे. त्यांचा अहिंसेचा संदेश जगभर समानता आणि न्यायासाठी आशेचा किरण आहे.
डॉ. मार्टिन ल्यूथर किंग आणि महात्मा गांधी यांचा अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीवर मोठा प्रभाव होता आणि गांधींच्या आदर्शांच्या शक्तीची आठवण करून दिली, अशा शब्दांत अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे.
एरिक गार्सेटी यांनी सोशल मीडियावर चरखा काततानाचे आपले छायाचित्र पोस्ट केले असून पुढे म्हटले आहे की, महात्मा गांधींचा अहिंसेचा संदेश जगभरातील समानता आणि न्यायासाठी आशेचा किरण आहे.
दरम्यान, नवी दिल्लीतील फ्रान्सचे राजदूत थियरी मॅथाऊ यांनीही गांधी जयंतीनिमित्त बापूंचे स्मरण केले. थियरी मॅथाऊ यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, फ्रेंच दूतावासातील प्रत्येकजण महात्मा गांधी आणि त्यांच्या शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेच्या मूल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
गांधीजींनी या मूल्यांचे काटेकोरपणे पालन केले. फ्रान्समध्ये गांधीजींचे खूप कौतुक केले जाते आणि स्ट्रासबर्ग आणि व्होरिल येथे स्थापित केलेले गांधी पुतळे याचा पुरावा आहेत.