नवी दिल्ली : अमेरिकन दुतावासाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना योग्य उपचार मिळण्याची खबरदारी आरोग्य खात्याकडून घेतली जात आहे.
आमच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही भारतीय प्रशासनाच्या संपर्कात असून त्याला योग्य उपचार मिळावेत, याची काळजी भारतीय आरोग्य विभागातर्फे घेतली जात आहे. मात्र, गोपनीयतेच्या कारणांमुळे आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही, असे अमेरिकेच्या येथील दुतावासाने म्हटले आहे.
दिल्लीत 300 कोरोना बाधीत सापडले असून तब्लिघी जमातमुळे तेथील बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.