वॉशिंग्टन- अमेरिकेत करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या आज पहिल्या महायुद्धात मृत्यूमुखी पडलेल्या एकूण संख्येपेक्षाही अधिक झाली आहे. अमेरिकेत करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मंगळवारी 1,16,526 इतकी झाली, असे जॉन हॉपकिन युनिव्हर्सिटीने म्हटले आहे. पहिल्या महायुद्धात 1,16,516 जण मरण पावले होते. त्यापेक्षाही करोनाच्या मृत्यूंची संख्या अधिक झाली आहे.
यातील करोना मृत्यू आणि पहिल्या महायुद्धातील मृत्यू हे दोन्ही आकडे अगदी नेमके आहेत. करोनाच्या चाचण्यांच्या अभावामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर अंदाजे शंभर वर्षापूर्वी झालेल्या पहिल्या महायुद्धाच्यावेळी झालेल्या मृत्यूची मोजणी करण्यात अनेक अडचणी होत्या. त्यातही उपलब्ध असलेली आकडेवारी इतिहासकार आणि संसदीय संशोधन सेवेकडून ग्राह्य मानली गेली होती.