उर्वशीने फॅन्सची मागितली माफी

सोशल मीडियावर नेहमी ऍक्‍टिव्ह असणाऱ्या उर्वशी रौतेलाने एका मोठ्या चुकीसाठी आपल्या फॅन्सची माफी मागितली आहे. आपल्या अजाणतेपणी आपल्याकडून फॅन्सना दुखावले गेले आहे, हे आपल्या लक्षात आल्याचे तिने म्हटले आहे. 

 

याबद्दल तिने आपल्या फॅन्सची हात जोडून माफी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी हा किस्सा घडला होता. ज्या हॉटेलमध्ये तिचा मुक्‍काम होता तिथे तिला भेटण्यासाठी तिचे 50-60 पॅन देखील आले होते. 

 

 

तिला भेटण्यासाठी ते सगळेजण 72 तास ताटकळत थांबले होते. मात्र, उर्वशीला कोठेतरी जायचे होते. त्यामुळे गडबडीत ती काही फॅन्सना अगदी घाईघाईने भेटली आणि निघून देखील गेली. तिच्या एका फॅनने सोशल मीडियावरून याबद्दल नाराजी व्यक्त केल्यावर उर्वशीला आपली चूक समजली. 

 

पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ती आपली चूक दुरुस्तदेखील करू शकली नाही. म्हणून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून युरोपातील आपल्या सगळ्या फॅन्सची मनापासून माफी मागितली आहे. या सर्व फॅन्सना आपण पर्सनली भेटण्यास उत्सुक आहोत, असेही तिने म्हटले आहे.

=========================

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.