कंगना राणावतकडे 6 महिन्यांपासून नाही काम; टॅक्‍स भरण्यासाठी ही पैसे नाही शिल्लक

आपल्या सडेतोड वक्‍तव्यांमुळे कंगना राणावत नेहमी चर्चेत असते. स्वतःला सर्वाधिक जास्त टॅक्‍स भरणारी ऍक्‍ट्रेस म्हणवते. मात्र, गेल्या 6 महिन्यांपासून ती टॅक्‍स भरू शकलेली नाही. तिने स्वतःच याबाबतचा खुलासा केला आहे. 

टॅक्‍स न भरू शकण्याचे कारण म्हणजे तिच्याकडे गेल्या 6 महिन्यांपासून कोणतेही काम नाही. त्यामुळे तिच्याकडे खूप पैशांची तंगी आहे. कंगना सर्वाधिक टॅक्‍सच्या श्रेणीमध्ये येते. आपल्या उत्पन्नातील 45 टक्‍के हिस्सा ती टॅक्‍स भरण्यात घालवत असते. 

मात्र सध्या कामच नसल्यामुळे ती टॅक्‍स वेळेवर भरू शकलेली नाही. आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात असे पहिल्यांदाच घडले आहे, टॅक्‍स भरायला आपल्याला पहिल्यांदाच उशीर झाला आहे. 

मात्र, तरीही सरकार आपल्या पेंडिंग टॅक्‍सवर व्याज लावते आहे. पण तरीही आपण याचे स्वागतच करत असल्याचे कंगनाने म्हटले आहे. सध्याची वेळ आपल्या सगळ्यांसाठीच खूप अवघड आहे. 

आपण सर्वंनी एकमेकांना मदत केली पाहिजे, असेही ती म्हणाली. आगामी काळात कंगणा थलायवी, धाकड आणि तेजस या तीन सिनेमांमध्ये दिसणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.