मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘उर्मिला कोठारे’ने आपल्या डान्स, अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. उर्मिला कोठारे ही मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात फिट आणि हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सोशल मिडीआयवर लाखो फॉलोवर्स आहेत.
दरम्यान, आता पुन्हा एका उर्मिला नव्या मालिकेतून आणि नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
उर्मिला कोठारे तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे. ही मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार असून, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.