मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. सोशल मीडियावर देखील उर्फीचा मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
दरम्यान, नेहमीच आपल्या हटके कपड्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या उर्फी जावेदच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचं दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे खुद्द अभिनेत्रीने आपल्या शरीरावर झालेल्या जखमांचं कारण सांगितलं आहे. उर्फीने या जखमांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘अंगभर कपडे घातल्यामुळे मला एलर्जी होते’ असं उर्फीने या व्हिडीओमध्ये सांगितलं.
मात्र, आता उर्फीच्या या व्हिडिओवर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “एलर्जी असेल तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत. त्या गोळ्या देऊन आपण एलर्जी दूर करू शकतो, काही काळजी करायची गरज नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं ज्या सावित्री बाईंनी आम्हाला सक्षम व सुशिक्षित बनवलं त्याच सावित्रीच्या लेकी आज अशा नागड्या गोष्टीचं समर्थन करतात. हे त्या सावित्री बाईंना तरी अभिप्रेत असेल का?’ असं सवालच चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
आपल्या व्हिडिओत उर्फी जावेद नेमकं काय म्हणाली….
उर्फी म्हणते, “जेव्हा मी पूर्ण कपडे घातले, तेव्हा मला अशी अडचण येते. जेव्हा पूर्ण किंवा लोकरीचे कपडे घालते, तेव्हा मला अशी एलर्जी होते. ही माझ्यासाठी फार मोठी अडचण आहे. आता तुम्हाला देखील समजलं असेल की मी पूर्ण कपडे घालत नाही. पुरावा तुमच्या समोर आहे, माझ्या शरीराला कपड्याची ऍलर्जी आहे.’ असं अभिनेत्री म्हणत आहे. सध्या उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.