मुंबई – एकेकाळी अभिनयातून करिअरची सुरुवात करणारी उर्फी जावेद आता तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे लोकांमध्ये चर्चेत असते. ती कुठेही असली तरी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये लोकांसमोर यायला विसरत नाही. उर्फी जणू फॅशनच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट ट्राय करताना दिसते. असं असलं तरी तिचा चाहता वर्ग वेगळा आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर आपल्या आगळ्यावेगळ्या ड्रेसचा व्हिडीओ शेअर केला आहे.
उर्फी तिच्यासमोर जे काही असेल ती त्यावर प्रयोग करून तिचा ड्रेस बनवते. प्रत्येक वेळी ती असे काही करते की लोकांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. यावेळी उर्फीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यावेळी उर्फीने चक्क शूज पासून बनवलेला ड्रेस घातला आहे. जो कि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
View this post on Instagram
उर्फी जावेद अतरंगी ड्रेसही अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते. तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी तिला जितकं ट्रोल केलं जातं तितकंच तिच्या आत्मविश्वासाचं कौतुकही होतं. उर्फीचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती शूजप्रमाणे ड्रेस परिधान केल्यामुळे ट्रोल झाली आहे. उर्फी जावेदने तिच्या ऑफबीट फॅशनच्या आधी अभिनयातही नशीब आजमावले आहे. तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनह’ आणि ‘चंद्र नंदिनी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ती ‘बिग बॉस ओटीटी’चा भागही राहिली आहे.