दिल्ली :- यमुनेच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाल्यानंतर आता सातत्याने पाण्याची पातळी कमी होत आहे. मात्र दिल्लीत पुराचा धोका अजूनही कायम आहे. कारण दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात परत एकदा पाऊसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान पूरग्रस्त दिल्लीत हवामान खात्याने शनिवारी यलो अलर्ट जारी केला होता.
त्यानुसार दिल्ली एनसीआरमध्ये पाऊस पडत आहे. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. ITO, राजघाट आणि लाल किल्ला यांसारख्या पूरग्रस्त भागात पावसामुळे आणखी पाणी वाढू शकते. कारण या भागात आधीच पुराचे पाणी आहे.
या पावसामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. त्याचवेळी नोएडा आणि गाझियाबादमध्येही काळे ढग होते आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला आहे.
नोएडामध्ये काही ठिकाणी काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे अंधार झाला आहे. ढगांच्या आच्छादनासह हलका वाराही वाहत आहे.