मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात सुरु असलेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला.
मात्र, अश्यातच अभिनेत्रीचे काही हटके लूकमधील फोटो समोर आले आहेत. सध्या उर्फीचे हे फोटो सोशलवर चांगलाच धुमाकूळ घालत असून, फॅन्सला देखील तिचा हा नवीन लूक आवडला असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच उर्फीला मुंबईतील एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं होत. यावेळी अभिनेत्रीचा अतिशय हटके लूक दिसून आला.
नेहमीप्रमाणे उर्फीने अगदी नावापुरते कपडे परिधान केले होते. काळ्या रंगाचे स्कर्ट घातले असून काळ्या रंगाची बिकिनी तिने घातली आहे. मात्र, बिकिनीवर तिने आईस्क्रीम कोन तयार केले असल्याने तिला ट्रोल केले जात आहे. सध्या तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकऱ्यानी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.