नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने शैक्षणिक वर्ष 2024 साठी नागरी सेवा, भारतीय वन सेवा, NDA, CDS (I) आणि इतर भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
युपीएससी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स 2024 आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) प्रिलिम्स 26 मे 2024 रोजी होणार आहेत. त्यासह, यूपीएससी एनडीए परीक्षा 2024 साठी अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे. विद्यार्थी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पाहू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.