नवी दिल्ली – इस्रायलने (Israel) गाझा पट्टयातील आपले हवाई हल्ले आणखीन वाढवले आहेत. यामुळे अनेक रहिवासी इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. अलीकडच्या दिवसांमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये शेकडो जण मारले गेल्याचा अंदाज आहे. बॉम्बस्फोटांमुळे नुकसान झाल्याने आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गाझा पट्ट्यातील रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत. मंगळवारी झालेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तब्बल 704 जण ठार झाल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले. हमासच्या (hamas) या दाव्याला त्रयस्थ वृत्तसंस्थेकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने लोक ठार झाल्याच्या वृत्ताची पडताळणी होऊ शकली नाही, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनीही मान्य केले आहे. (Israel war)
इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझातील (Gaza) मृत्यूंचा आकडा वाढायला लागला आहे. इस्रायलच्या पायदळाची थेट कारवाई सुरू होण्यापूर्वीच ही आतापर्यंतची एका दिवसातली सर्वात मोठी जीवितहानी असल्याचे मानले जाते आहे. युद्धात आतापर्यंत 5,700 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, यात सुमारे 2,300 बालकांचा समावेश आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.
इस्रायलच्या नाकाबंदीमुळे गाझामधील 2.3 दशलक्ष लोकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा मिळणे दुरापस्त झाले आहे. हमासच्या ठिकाणांवर 400 हवाई हल्ले केले गेले. इस्रायलविरोधात रॉकेट हल्ल्यांची तयारी करत असलेले हमासचे कमांडर या हल्ल्यांमध्ये मारले गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हमासच्या भूमिगत बंकरनाही इस्रायलने लक्ष्य केले आहे. इस्रायलकडून सोमवारी 320 हवाई हल्ले करण्यात आले होते.
हमासच्या पाणबुड्यांनाही इस्रायलने केले लक्ष्य
गाझाच्या उत्तरेकडून समुद्रमार्गे इस्रायलमध्ये घुसखोरी करण्याचा हमासचा प्रयत्नही इस्रायलने हाणून पाडला आहे. हमासच्या पाणबुड्यांवर हवेतून, नौकांमधून आणि जमिनीवरूनही लक्ष्य करण्यात आले, असे इस्रायलच्या सैन्य दलाने म्हटले आहे. गाझाच्या दक्षिण आणि मध्य भागातील नागरिकांना इस्रायलने सुरक्षित आश्रय घेण्याची सूचना केली आहे. या भागांमधील अनेक रहिवासी इमारती इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. दुसऱ्या हल्ल्याने मध्य गाझामधील नुसीरत निर्वासित शिबिरातील गजबजलेली बाजारपेठ नष्ट केली,