नवी दिल्ली -बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती या भाजपच्या भाषेत बोलत आहेत, अशी टीका मार्क्सवादी क्युनिस्ट पार्टीच्या नेत्या वृंदा कारत यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजवादी पार्टीबरोबर खूष नाहीत आणि सपाला मत देणे म्हणजे गुंडा राज आणि माफिया राजला मत देण्यासारखे आहे, असे मायावती म्हणाल्या होत्या.
मात्र एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठीचे मायावतींचे वक्तव्य भाजपसारखेच आहे, असे वृंदा कारत म्हणाल्या. मायावतींचे हे वक्तव्य अजिबात योग्य नाही. भाजपची भाषा मला समजते. या निवडणूकीत भाजपची भाषा अतिशय शिवराळ आहे, उत्तर प्रदेशातील चौथ्या टप्प्याचे मतदान आज झाले. या निवडणूकीत योगी आदित्यनाथ सरकारविरोधात लाट आहे, ही एक समाधानाची बाब आहे, असेही कारत म्हणाल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने या निवडणूकीत भेद निर्माण करणारी जातीयवादी मुद्यांची भाषणे केली आहेत. आता उत्तर प्रदेशच्या मतदारांचे नव्हे तर देशातील जनतेनेच निवडणूक आयोगाची भूमिका काय असायला पाहिजे हे ठरवायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.