पुणे – सिरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीच्या काही मजल्यांचे प्रचंड नुकसान झाले मात्र कोणतीही जीवीत हानी झाली नाही. आगीची घटना समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. जवळपास चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट अग्नितांडव : दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश – अजित पवार
ही आग बीसीजी लस बनवण्याच्या युनिटला लागली असून करोना लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
Breaking News : पुण्यातील करोना लस बनविणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला आग
मांजरी बुद्रुक येथे सिरम इन्स्टिट्युट कंपनीचे सेझ युनिट आहे. त्यातील एका इमारतीला आग लागली होती. इमारतीच्या एका बाजूने बंबांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीची तीव्रत इतकी होती की, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारेल तरी काही वेळाने पुन्हा तेवढ्याच ताकदीने पुन्हा आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. मात्र, अखेर चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.
Thank you everyone for your concern and prayers. So far the most important thing is that there have been no lives lost or major injuries due to the fire, despite a few floors being destroyed.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे.
मोठी बातमी ! पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अगीत 5 जणांचा मृत्यू