Crime | शेजाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पत्नीने केला पतिचा खून; नंतर फासावर लटकवला मृतदेह

नोएडा – उत्तर प्रदेशातील नोएडा येथील बरौली गावात एका व्यक्तिचा मृत्यू झाला होता. मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. सर्वजण ही आत्महत्या असल्याचे बोलत होते. पोलिसांनी अधिक तपास केला तेंव्हा धक्कादायक खुलासा झाला. ही आत्महत्या नसून पत्नीनेच खून केल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीने अगोदर शेजाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर त्याच्यासोबत मिळून पतिचा खून केला. पोलिसांना चकवा देण्यासाठी या घटनेला आत्महत्येत बदलण्याची शक्कल लढवली.

नोएडाचे अॅडिशनल डीसीपी रणविजय सिंह सांगितले की, मृत मुकेश च्या कथित आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी मुकेशच्या पत्नीवर संशय व्यक्त केला. मुकेशच्या कुटुंबीयांना संशय होता की त्याची पत्नी सपनानेच आपला प्रियकर अंकितच्या साहाय्याने खून केला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासात समजले की, सपना आणि मुकेश दोघेही एकाच गावातील होते. मुकेश ने सपनासोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोघे नोएडा येथे राहण्यासाठी आले होते. लग्नानंतर काही दिवसानंतर मुकेश आपल्या पत्नीला दररोज मारहाण करत होता. सततच्या त्रासाला कंटाळून सपनाने त्याला धडा शिकवण्यासाठी त्याचा खून करून आत्महत्येचा बनाव केला.

मुकेशचा खून करण्यासाठी सपनाने शेजारी राहणाऱ्या अंकितला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर अंकितला आपल्या पतिचा खून करण्यास सांगितले. मात्र अंकित या गोष्टीसाठी तयार होत नव्हता. त्यावेळी सपनाने त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. त्यानंतर अंकित मुकेशचा खून करण्यासाठी तयार झाला. अंकित ने वेळ साधून गळा दाबून मुकेशचा खून केला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुकेशच्या भाच्याने पोलिसांना सांगितले की, सपना चे चारित्र्य ठीक नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर काही वेळातच सपना आपले सामान पॅक करून कुठेतरी जाण्याच्या तयारी करत होती. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी सपनाची चौकशी केली असता ती घाबरली आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला. तीने खूनाची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी सपना आणि प्रियकर अंकितला अटक केली आहे. पुढील तपास नोएडा पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.