श्रीनगर – काश्मीरातील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या जवानांशी झालेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवादी काल रात्री मारले गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मारले गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता तीन झाली आहे.
या जिल्ह्यातील हादीपोरा येथे ही चकमक झाली. एक दहशतवादी तेथे शनिवारी मारला गेला होता. काल रात्री ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक जण त्या संघटनेत नव्यानेच दाखल झाला होता. त्याला शरणांगतीसाठी मन वळवण्याचे सुरक्षा दलाने कसोशिचे प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही अखेर तोही काल मारला गेला.
या मुलाला शरण आणण्यासाठी त्याच्या आई वडिलांनाही तेथे आणण्यात आले होते. त्यांचे आवाहनही त्याने मानले नाही. हे दोन अतिरेकी मारले गेल्यानंतरही सुरक्षा दलांचे या भागातील कॉम्बिग ऑपरेशन आजही सुरूच होते.