भोरमध्ये प्रशासानाची होतेय दमछाक
भोर – भोर तालुक्यातील करोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसून दिवसेंदिवस बाधितांचा आलेख वाढतच आहे. त्यातच करोनाबाधितांच्या अवास्तव जीभेचे चोलले पुरवताना प्रशासनाची दमछाक होत आहे.
भोर तालुक्यात गुरुवारी (दि.3) एकाच दिवसात 46 जणांचे आहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात भोर शहरात 13, भोलावडे 6, हातनोशी 6, वेळू 3, रांजे 2, आळंदे 2, उत्रौली, कापूरहोळ, माळवाडी, धांगवडी, जांभळी, पिसावरे, शिरवली, वागजवाडी, शिंदेवाडी, खोपी, सावारदरे, न्हावी, बाजारवाडी, चिखलागांव येथे प्रत्येकी एक असे एकूण 46 जणांचा यात समावेश आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या 709 झाली असून 273 करोना बाधितांवार उपचार सुरू आहेत. 450 जणांनी करोनावर मात केली असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
रामबाग येथे उपजिल्हा रुग्णालयात, आयटीआय येथे व एटी महाविद्यालयतील मुलींच्या वासतिगृहात 138 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, येथील रुग्ण प्रशासनाकडे अवास्तव मागण्या करीत आहेत. तर कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अर्वाच्च भाषा वापरून जीभेचे चोचले भागवाण्यासाठी प्रशासनावर शिंतोडे उडवत असल्याने प्रशासनाची काम करताना पुरती दमछाक होत आहे.
- बेडची भोर शहरात संख्या वाढवण्याचा शासन प्रयत्न करत असून मुकबधिर विद्यालयात 100, ससेवाडी येथे 100 व रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात 60 बेडची व्यवस्था कराण्यात येणार आहे.
– विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी, भोर