पीडितेच्या कुटूंबियांनी लिहिलेल्या पत्राचा सरन्यायाधिशांनी अहवाल मागितला
नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी या प्रकरणातील पीडितेच्या कुटूंबियांनी न्यायालयास लिहीलेल्या पत्राचा उल्लेख केला. तसेच हे पत्र आपल्यापर्यंत अजून कसे पोहचले नाही याबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाकडून मागितला आहे.
Supreme Court asks the Secretary General to explain why the letter (dated July 12) sent by the Unnao rape victim was not placed before the court. Medical report of the victim was also sought. Chief Justice of India (CJI) was to hear the Unnao case tomorrow. pic.twitter.com/gj3k5oTglK
— ANI (@ANI) July 31, 2019
दोन दिवसापुर्वी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडिता कार दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झाली. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहून आरोपींकडून जिवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पत्राचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाकडून अहवाल मागवला आहे. सर्वोच्च न्यायालयात हे पत्र कसे आले, केव्हा आले आणि या पत्रात काय मागणी करण्यात आली होती, या सर्व तपशीलाचा वृत्तांत सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाकडून मागवला आहे. दुसरीकडे बलात्कार पीडितेच्या घरच्यांनी हे पत्रा 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लिहिले होते. यात आरोपी आमदाराच्या ओळखीच्यांकडून धमक्या येत असल्याचे सांगण्यात आले होते. हे पत्र पीडितेची आई, बहीण आणि काकूनी मिळून लिहिले होते.