नॉन क्रिमिलेअरमुळे अडकली वेतनवाढ

पुणे – “वनसेवेत रूजू होताना “नॉन-क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र न जोडल्याने पुणे वनविभागातील काही महिला वनसुरक्षा रक्षकांची वेतनवाढ रोखली आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी वनसेवेत 10 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. आतापर्यंत या सुरक्षारक्षकांना कधीही या प्रमाणपत्राची मागणी केली नाही, मात्र आता प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे, परंतु आता हे प्रमाण पत्र उपलब्ध होणे शक्‍य नसल्याने, या समस्येवर काय उपाय काढावा, असा प्रश्‍न या महिला वनसुरक्षा रक्षकांना पडला आहे.

वनविभागातर्फे 2006 साली घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान विभागातर्फे काही महिला वनसुरक्षारक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली होती. जुन्नर उपवनविभागांतर्गत घेण्यात आलेल्या भरतीप्रसंगी या महिला कर्मचाऱ्यांकडून “नॉन-क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते. नुकतीच या सुरक्षारक्षकांची पुणे उपवनविभागात बदली झाल्यानंतर त्यांना या प्रमाणपत्राबाबत विचारणा करण्यात आली. तसेच हे प्रमाणपत्र नसल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी म्हणाल्या, “या प्रकरणाबाबत माहिती मिळाली आहे. या भरतीप्रक्रियेची पूर्ण चौकशी करून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.