नवी दिल्ली – भारताचा अमेरिकेकडून खेळू लागलेला क्रिकेटपटू उन्मुक्त चंद यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियातील बिगबॅश टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. चंद याने भारतीय संघाला 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र, सातत्याने सरस कामगिरी केल्वरही त्याला भारताच्या वरिष्ठ संघात एकदाही निवडले गेले नाही.
अखेर त्याने कंटाळून भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती गेत अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. तीथे त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली व त्यामुळेच त्याला बिगबॅश स्पर्धेच्या आयोजकांकडून खेळण्याचा प्रस्ताव आला होता. त्यानेही हा प्रस्ताव स्वीकारला असून तो ऑस्ट्रेलियात दाखल जाला आहे.
2012 साली चंद याने कर्णधारपद असताना भारतीय संघाला 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा जिंकून दिली होती. आता बिग बॅश लीग खेळणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. चंद मेलबर्नवर डॉकलॅंड्स स्टेडियमवर मेलबर्न रेनेगेड्स संघासाठी पदार्पणाचा सामना खेळणार आहे.
उन्मुक्त चंदने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अमेरिकेला गेला. यादरम्यान त्याने बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्ससोबत करार केला, जिथे त्याला अद्याप संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण आता तो संघासाठी खेळणार आहे.