नवी दिल्ली – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याची लखनौ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लखनौ संघाने तब्बल 15 कोटी रुपयांचा करार केला आहे.
यंदाच्या आयपीएल मोसमापासून अहमदाबाद व लखनौ हे दोन नवे संघ सहभागी होत असून या स्पर्धेच्या लिलावापूर्वी लखनौ संघाने राहुलसह रवी बिश्नोई आणि मार्कस स्टोनिस यांना संघात सामील केले आहे.
स्टोनिसला 11 कोटी तर, बिश्नोईला 4 कोटी रुपयांचा करार दिला आहे. तसेच झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.