कर्नाटकात डीआरडीओच्या मानवरहित विमानाला अपघात

बंगळूरु : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओच्या मानवरहित विमानास मंगळवारी सकाळी कर्नाटकात अपघात झाला आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील जोडीकिनाहल्ली येथे सकाळी 6 वाजता यूएव्हीचा अपघात झाला. हे डीआरडीओचे रुस्टम 2 यूएव्ही आहे. हे विमान उडवण्याचा आज याचा प्रयत्न केला जात होता त्याच वेळी ही दुर्घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी डीआरडीओचे अधिकाऱ्यांनी धाव घेवून परिस्थितीची पाहणी केली.

चालाकेरे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) मध्ये मानवरहित विमानांची आउट-डोर टेस्टिंग केले जाते. इथे डीआरडीओच्या केवळ मानव रहित विमानांसाठी काम करण्यात येते. याच परिसरात विमानाची दुर्घटना झाली आहे. दरम्यान, चित्रदुर्गचे एसपींनी या घटनेविषयी माहिती दिली आहे. डीआरडीओचा रुस्तम 2 उड्डाण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते परंतू, याच दरम्यान विमान क्रॅश झाले. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांना याविषयी माहिती नसल्याने ते पाहण्यासाठी त्यानी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.