पुणे – राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर काही जिल्ह्यांमधील करोना रुग्णवाढीचा दर नक्कीच कमी झाला. मात्र करोना विषाणूचा नवीन स्ट्रेन हा वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णपणे उठवता येणे शक्य नाही. मात्र कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आता त्यांनी पुण्यातील लॉकडाऊन संदर्भात महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.