नवी दिल्ली – दिल्लीतील द्वारका भागात आज सकाळी काही अज्ञात इसमांनी सुरक्षा जवानांवर हल्ला चढवला. त्यात दिल्ली पोलिस दलातील एक कॉन्स्टेबल आणि एक होमगार्ड असे दोन सुरक्षा जवान जखमी झाले. हे जवान तेथे पहारा देत असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमाराला त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे समजते. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. कॉन्स्टेबल राजीव यांनी हल्लेखोरांवर गोळीबार करून त्यांना प्रत्युत्तर दिले त्यामुळे ते तेथून लगेच पळून गेले. तथापी या हल्ल्यात हे दोघेही सुरक्षा जवान जखमी झाले असून त्यांना वेंकटेश्वर हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.